गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असा १० दिवस गणपतीचा हा उत्साह राहील. अनेक ठिकाणी आकर्षक गणपती बाप्पा विराजमान झाले आहे आणि येथील देखावेही डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत.
मुंबईतील देखावे आणि गणेश मुर्ती बघण्याची सर्वांना आतुरता असते. कारण येथील काही प्रसिद्ध गणेश मंडळ आणि नवसाला पावणारे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. जाणून घ्या वडाळ्यातील किंग सर्कल येथील आणि मुंबईतीस सर्वात श्रीमंत जीएसबी मंडळाच्या बाप्पाचे खास वैशिष्ट्य.
गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) गणपती सेवा मंडळाने गतवर्षी तब्बल ४०० कोटी ५८ लाखांचा विमा काढला आहे. कारण येथे होणारी गर्दी आणि बाप्पाच्या अंगावरील दागदागीनेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल दरवर्षी उचलावे लागते.
गणपतीची मुर्ती आकर्षक असून डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या आभूषणांनी नटलेली दिसते. २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे ३१६ कोटी आणि ३४० कोटींचा विमा काढण्यात आला होता.
मंडळाचे हे यंदाचे ७० वे वर्ष असून, परंपरेनुसार ५ दिवस गणपती बाप्पा विराजमान राहतात. जीएसबीच्या गणपतीला ६६ किलो पेक्षा अधिक सोनं आणि ३०० किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने घालण्यात आले आहेत.