सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे.
(All Photos: Instagram)‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील ‘गौरी’ म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे.
प्रेक्षकांची लाडकी ‘कावेरी’ अर्थात अभिनेत्री तन्वी मुंडले हिच्या घरी देखील पारंपारिक रुपात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
अभिनेत्री अश्विनी कासार हिच्या घरी देखील गणपती स्थापना झाली असून, अतिशय साध्या आणि सुंदर सजावटीने लक्ष वेधलं आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम ‘ईशा’ म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे.
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आशुतोष गोखले यांच्या घरी सुंदर हास्य चेहऱ्यावर लेवून बाप्पा आला आहे.