Ganesh Visarjan : आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना… भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन-ganesh visarjan miravnuk 2024 lalbaugcha raja and other ganpati bappa mumbai pune maharashtra ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ganesh Visarjan : आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना… भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन

Ganesh Visarjan : आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना… भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन

Ganesh Visarjan : आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना… भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन

Sep 18, 2024 01:30 PM IST
  • twitter
  • twitter
  • Ganesh Visarjan 2024 : दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची १७ सप्टेंबर रोजी सांगता झाली. गणपतीचे आगमनाने जसे वातावरण उत्साहीत होते, तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी डोळ्यात पाणी येते. लालबागच्या राजा सोबत पाहा गणेश विसर्जनाचे हे खास फोटो.
एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
share
(1 / 8)
एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आलेत निरोप देताना, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.(PTI)
सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. यावेळी चौपाटीचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला होता. अनेक तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. लालबागच्या राजा सोबत पाहा गणेश विसर्जनाचे हे खास फोटो.
share
(2 / 8)
सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. यावेळी चौपाटीचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला होता. अनेक तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. लालबागच्या राजा सोबत पाहा गणेश विसर्जनाचे हे खास फोटो.
काही मंडळांनी पारंपारिक ढोल वाद्य वाजवत या मिरवणुका काढल्या तर काही मंडळांनी डीजे म्युझिक लेदर शो चा वापर करत दणदणाट केला. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणरायाला निरोप देण्यासाठी तरूणही पाण्यात उतरले.
share
(3 / 8)
काही मंडळांनी पारंपारिक ढोल वाद्य वाजवत या मिरवणुका काढल्या तर काही मंडळांनी डीजे म्युझिक लेदर शो चा वापर करत दणदणाट केला. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणरायाला निरोप देण्यासाठी तरूणही पाण्यात उतरले.(AFP)
दरवर्षी गणेश विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहतं. यंदाही गणेश विसर्जन अजुनही सुरू आहे. गणेश विसर्जनातील गणपती बाप्पा पाण्यात मध्यभागी पोहचल्यानंतरचा हा पहाटेचा फोटो.
share
(4 / 8)
दरवर्षी गणेश विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहतं. यंदाही गणेश विसर्जन अजुनही सुरू आहे. गणेश विसर्जनातील गणपती बाप्पा पाण्यात मध्यभागी पोहचल्यानंतरचा हा पहाटेचा फोटो.(AFP)
गिरणगावात सर्व उत्सव मोठ्या उत्साहानं आणि दिमाखात साजरे होतात. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजूकायाचा राजा, महागणपती, परळचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपती याच परिसरात विसर्जित केले जातात.
share
(5 / 8)
गिरणगावात सर्व उत्सव मोठ्या उत्साहानं आणि दिमाखात साजरे होतात. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजूकायाचा राजा, महागणपती, परळचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपती याच परिसरात विसर्जित केले जातात.(AFP)
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला काल १० वाजून २० मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती.  
share
(6 / 8)
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला काल १० वाजून २० मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती.  (AP)
अजून ही मिरवणुका चालूच आहेत. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड , केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरूच आहे. आता या मिरवणुकीला अनेक तास उलटले आहेत.
share
(7 / 8)
अजून ही मिरवणुका चालूच आहेत. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड , केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरूच आहे. आता या मिरवणुकीला अनेक तास उलटले आहेत.(AFP)
गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण गणेश भक्त नदीच्या पाण्यात वाहून गेले, अशा घटनाही अनेक ठिकाणी घटीत झाल्या आहेत. प्रत्येक वर्षी अशा दु:खद घटना घडतात. परंतू, प्रत्येक वर्षी नवीन उत्साहाने, जोमाने गणेशोत्सव साजरा होतो आणि गणेश विसर्जनालाही भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते.
share
(8 / 8)
गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण गणेश भक्त नदीच्या पाण्यात वाहून गेले, अशा घटनाही अनेक ठिकाणी घटीत झाल्या आहेत. प्रत्येक वर्षी अशा दु:खद घटना घडतात. परंतू, प्रत्येक वर्षी नवीन उत्साहाने, जोमाने गणेशोत्सव साजरा होतो आणि गणेश विसर्जनालाही भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते.(Hindustan Times)
इतर गॅलरीज