पुण्याला ऐतिसाहिक आणि प्राचीन वारसा लाभलेला आहेच. पण येथील गणेशोत्सवाची शान पाहण्यासारखी असते. जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते आहेत आणि या वर्षी इथे कोणता देखावा पाहायला मिळेल.
कसबा गणपती- मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती पुण्यातील ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जायचे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. या वर्षी इथे श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक चा देखावा केला आहे.
तांबडी जोगेश्वरी –मानाचा दुसरा गणपती
बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. यंदा स्वानंद निवासदाचा देखावा केला आहे.
गुरुजी तालिम मंडळ –तिसरा मानाचा गणपती
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे. या वर्षी मंडळाने गजमहालचा देखावा साकारला आहे.
तुळशीबाग गणपती- चौथा मानाचा गणपती
दक्षित तुळशीबागवाले यांनी वर्षे १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. वर्ष १९७५ मध्ये, पहिल्यांदाच फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना या मंडळाने केली. फायबरची मूर्ती स्थापन करणारे हे पहिलेच गणेश मंडळ होते. यंदा तुम्हाला इथे गेल्यावर ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिरचा देखावा पाहायला मिळेल.
केसरी वाडा गणपती- पाचवा मानाचा गणपती
पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचागणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव वर्षे १८९४ पासून सुरु झाला. या वर्षीचा देखावा आकर्षक राहील, ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पुणे
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली.[३] राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी आहे
या वर्षी मिरवणूकीत लाठीकाठीची प्रात्यक्षिके, शिखंडी, शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नुमवि, कलावंत, श्रीराम ढोल-ताशा पथकांच्या वादनाचा निनाद पाहायला मिळाला.