(5 / 7)उकडीचे मोदक-वाफवलेल्या मोदकाला उकडीचे मोदक म्हणतात. अशा प्रकारे शिजवलेले मोदक श्रीगणेशाला अतिशय प्रिय असतात, असे मानले जाते. त्यामुळेच दरवर्षी गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबांमध्ये उकडीचे मोदक बनवले जातात. या प्रकारचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ, मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे आवरण तयार करून त्यात नारळ आणि गुळाचे सारण भरले जाते.