(6 / 8)मिथुन : वर्ष २०२५ मध्ये तुमच्या लग्नभावात म्हणजेच पहिल्या भावात गुरू-शुक्राची युती होणार असल्याने तुमच्या लग्नभावात गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. गजलक्ष्मी राजयोगामुळे मिथुन राशीत शुक्र आणि गुरूचा शुभ प्रभाव पडेल, ज्यामुळे जीवनात शुभ लाभ होण्याची शक्यता राहील. या राशीचे जातक पंचम, सप्तम आणि नवम भावात देवगुरु गुरूच्या प्रभावाखाली असतील, ज्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून सुख, सौभाग्य आणि चांगली बातमी मिळेल. याशिवाय जे अविवाहित आहेत त्यांचे लग्नसंबंध जुळू शकतात. मानसिक समस्यांपासून सुटका मिळेल. लाभाच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. सौभाग्याने वर्षभर आर्थिक लाभाचे आणि उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. येणारे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने यशाने भरलेले असेल.