मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Iran President's Funeral: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसागर लोटला

Iran President's Funeral: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसागर लोटला

May 22, 2024 07:27 PM IST
  • twitter
  • twitter
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्या ताफ्यातील इतर सात सदस्यांची आज राजधानी तेहरानमध्ये अंत्ययात्रा निघाली होती. या अंत्ययात्रेत लाखो इराणी नागरिक सहभागी झाले होते.
इराणची राजधानी तेहरानमध्ये दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकूण सात जणांच्या अंत्ययात्रेत लॉरीमागे हजारो लोक धावताना दिसत होते. यावेळी अंत्ययात्रेत सामील झालेले अनेक जण छाती ठोकून शोक व्यक्त करताना दिसत होते. अनेक नागरिकांनी काळे कपडे परिधान केले होते. 
share
(1 / 7)
इराणची राजधानी तेहरानमध्ये दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकूण सात जणांच्या अंत्ययात्रेत लॉरीमागे हजारो लोक धावताना दिसत होते. यावेळी अंत्ययात्रेत सामील झालेले अनेक जण छाती ठोकून शोक व्यक्त करताना दिसत होते. अनेक नागरिकांनी काळे कपडे परिधान केले होते. (AP)
इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा इराणच्या एकूण चार शहरांमधून काढण्यात येणार आहे. तबरिज या प्रसिद्ध शहरातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर कोम, बिरजंड या शहरातून ही अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. इराणची राजधानी तेहरानमधून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
share
(2 / 7)
इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा इराणच्या एकूण चार शहरांमधून काढण्यात येणार आहे. तबरिज या प्रसिद्ध शहरातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर कोम, बिरजंड या शहरातून ही अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. इराणची राजधानी तेहरानमधून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.(AFP)
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्ययात्रेत हजारो इराणी नागरिक सामील झाले होते. या दुर्घटनेत इराणचे परराष्ट्रमंत्री आणि ताफ्यातील इतर सात जणांचा मृत्यू झाला होता. इराणमध्ये पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. इब्राहिम रईसी यांचे शव आज तबरीज शहरात आणण्यात आले होते. आपल्या राष्ट्राध्यक्षाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी हजारो इराणी नागरिक तबरीझ शहराच्या रस्त्यावर एकत्र आले होते. 
share
(3 / 7)
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्ययात्रेत हजारो इराणी नागरिक सामील झाले होते. या दुर्घटनेत इराणचे परराष्ट्रमंत्री आणि ताफ्यातील इतर सात जणांचा मृत्यू झाला होता. इराणमध्ये पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. इब्राहिम रईसी यांचे शव आज तबरीज शहरात आणण्यात आले होते. आपल्या राष्ट्राध्यक्षाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी हजारो इराणी नागरिक तबरीझ शहराच्या रस्त्यावर एकत्र आले होते. (AFP)
इराण आणि अझरबैजानला लागून असलेल्या सीमेवरील उभय देशामदरम्यानच्या संयुक्त धरण प्रकल्पाचे उदघाटन झाल्यानंतर ताब्रिझ शहराकडे परत येत असताना राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. या भागातील खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटून खाली पडल्याने हा अपघात झाला होता.
share
(4 / 7)
इराण आणि अझरबैजानला लागून असलेल्या सीमेवरील उभय देशामदरम्यानच्या संयुक्त धरण प्रकल्पाचे उदघाटन झाल्यानंतर ताब्रिझ शहराकडे परत येत असताना राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. या भागातील खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटून खाली पडल्याने हा अपघात झाला होता.(REUTERS)
यावेळी अनेक नागरिकांच्या एका हातात इराणचा राष्ट्रीय ध्वज तर दुसऱ्या हातात दिवंगत रईसी यांचा फोटो दिसत होता. अंत्ययात्रेत सामील झालेल्या अनेक इराणी नागरिकांनी यावेळी काळ्या रंगाची वस्त्र परिधान केले होते.
share
(5 / 7)
यावेळी अनेक नागरिकांच्या एका हातात इराणचा राष्ट्रीय ध्वज तर दुसऱ्या हातात दिवंगत रईसी यांचा फोटो दिसत होता. अंत्ययात्रेत सामील झालेल्या अनेक इराणी नागरिकांनी यावेळी काळ्या रंगाची वस्त्र परिधान केले होते.(AFP)
इराणची राजधानी तेहरान येथील मेहरबाबाद विमानतळावर दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची शवपेटी आणण्यात आली. तेहरानमध्ये अंत्ययात्रेतनंतर भव्य खोमेनी मशिदीत काही काळ अंत्यदर्शनसाठी त्यांचे शव ठेवण्यात आले होते.
share
(6 / 7)
इराणची राजधानी तेहरान येथील मेहरबाबाद विमानतळावर दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची शवपेटी आणण्यात आली. तेहरानमध्ये अंत्ययात्रेतनंतर भव्य खोमेनी मशिदीत काही काळ अंत्यदर्शनसाठी त्यांचे शव ठेवण्यात आले होते.(AFP)
इराणची राजधानी तेहरानमध्ये भव्य अशा खोमेने मशिदीत दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे शव काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील हजारो नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. यात महिलांची संख्या मोठी होती. 
share
(7 / 7)
इराणची राजधानी तेहरानमध्ये भव्य अशा खोमेने मशिदीत दिवंगत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे शव काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील हजारो नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. यात महिलांची संख्या मोठी होती. (AP)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज