(1 / 6)बॉलिवूडमधील स्टारकिड्स आणि नेपोटिझमचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. स्टारकिड्समुळे खऱ्या टॅलेंटला संधी मिळत नाही, असं मानणारा एक वर्ग इंडस्ट्रीत आहे. तर, काही सेलिब्रेटींचे मत आहे की, टॅलेंट नसेल तर चित्रपट चालणार नाहीत आणि टॅलेंटलेस नवोदितांना संधी देऊन कोणताही निर्माता आपले कोट्यवधी रुपये वाया घालवू इच्छित नाही. मग ती स्टार्सची मुलं असली तरी…. चला तर, मग जाणून घेऊया अशा काही कलाकारांबद्दल ज्यांनी स्वत: कबुल केलेय की, एका स्टार किडमुळे त्यांना सुरुवातीच्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले.