शाहरुख खान आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडींपैकी एक आहे. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ११९३ पासून ते २०१५ पर्यंत दोघांनी एकत्र काम केले आहे. आता या त्यांनी दिलेले कोणते हिट चित्रपट आहेत चला जाणून घेऊया…
(instagram)शाहरुख खान आणि काजोलचा पहिला चित्रपट बाजीगर होता. या चित्रपटात शाहरुखने अजयची भूमिका साकारली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाचा दोन मुली असलेल्या व्यावसायिकाशी बदला घेतो. यामध्ये शिल्पाने सीमा आणि काजोलने प्रियाची भूमिका साकारली होती. तो दोन्ही बहिणींवर प्रेम असल्याचे भासवतो. हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे.
(instagram)यानंतर शाहरुख आणि काजोल करण-अर्जुन या चित्रपटात दिसले. या चित्रपटात दोन भावांची कहाणी दाखवण्यात आली आहे, ते दोघे कसे मरतात आणि नंतर दोघेही पुन्हा जन्म घेतात. काजोलने शाहरुखच्या प्रियसीची भूमिका साकारली होती.
(instagram)शाहरुख आणि काजोल पुन्हा एकदा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सुपरहिट चित्रपटात दिसले. या चित्रपटानंतर ते दोघेही सुपरहिट जोडी ठरले होते. आजही प्रेक्षक या जोडीचे चित्रपट आवडीने पाहाताना दिसतात.
(instagram)'कुछ कुछ होता है'मध्ये शाहरुख खान आणि काजोलच्या कथेपासून सुरुवात होते. दोघेही आधी मित्र असतात. अंजलीची भूमिका साकारणारी काजोल शाहरुखच्या म्हणजेच राहुलच्या प्रेमात पडते. मात्र, नंतर टीना मधे येते आणि हे पात्र राणी मुखर्जीने साकारले होते. राहुल आणि टीनाचे लग्न झाले, पण नंतर टीनाचे निधन झाले.
(instagram)शाहरुख आणि काजोलने माय नेम इज खानमध्येही काम केले आहे. या चित्रपटात शाहरुखला एका आजाराने ग्रासले आहे. यामध्येही दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली कारण ते बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले होते
(instagram)