बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक वेळा तुम्ही अशी लोकेशन्स पाहतात ज्यामुळे तुम्हाला तेथे जाण्याची इच्छा होते. पण तुम्हाला माहित आहे का की काही चित्रपटांचे चित्रीकरण कलाकारांच्या खऱ्या घरातही झाले आहे. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल...
(instagram)रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात रणबीर कपूरच्या घराचा सीन दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र बसून फोटो क्लिक करते. हा सीन सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये शूट करण्यात आला आहे.
(instagram)अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांच्या 'की और का' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा कॅमिओ आहे. या दोघांमधील सीन बिग बींच्या घरातच शूट करण्यात आला होता.
(instagram)शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका होती. एक सुपरस्टार आणि एक चाहता. एक सीन आहे जिथे फॅन स्टारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला जाऊ दिले जात नाही. त्यात दिसणारे घर शाहरुखचा मन्नत बंगला आहे.
(instagram)प्रीती झिंटा आणि शाहरुख खानच्या वीर झारा या चित्रपटातील हम तो हैं या गाण्याचे चित्रीकरण पतौडी पॅलेसमध्ये झाले होते.
(instagram)बॉम्बे टॉकीज चित्रपटात काही शॉर्ट स्टोरीज दाखवण्यात आल्या आहेत. यातीलच एक कथा होती रणदीप हुड्डा आणि राणी मुखर्जीची. त्याचे शूटिंग लोकेशन करण जोहरचे घर होते. करणनेच ती कथा दिग्दर्शित केली होती. इतकेच नाही तर या चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन होते. हा सीन बिग बींच्या राहत्या घरात शूट करण्यात आला होता.
(instagram)