अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत रोमँटिक सीन्स दिले आहेत. काही सीन हे चर्चेत आले तर काही सीन वादाच्या भोवऱ्यात अडकले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत बोल्ड सीन दिले.
(instagram)ए दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी अनेक लिप किस सीन आणि बोल्ड सीन दिले होते. रणबीर ऐश्वर्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.
(instagram)इम्रान खान आणि करीना कपूर यांनी एक मैं और एक तू आणि गोरी तेरे गांव या चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'एक मैं और एक तू'मध्ये करिनाच्या म्हातारपणाची चर्चा रंगली होती.
(instagram)अक्षय कुमार आणि रेखा यांच्या वयात १३ वर्षांचे अंतर आहे. खिलाड़ियों का खिलाड़ी या चित्रपटात अक्षय आणि रेखा यांच्यात एक रोमँटिक सीनही होता. या सीनची जोरदार चर्चा झाली होती.
(instagram)बिपाशा बसूने 'अलोन' या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हरसोबत काम केले होते. तेव्हा त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. या चित्रपटात दोघांमध्ये बोल्ड सीन्स होते. जरी आज दोघांचे लग्न झाले असले तरी करण बिपाशापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे.
(instagram)