हिमाचल प्रदेशमधील मनाली-लेह महामार्ग आणि औट-लुहरी राष्ट्रीय महामार्ग या भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
(ANI)कुल्लूचे उपायुक्त टोरुल एस रवीश यांच्या मते, "कुल्लू जिल्ह्यात जोरदार हीमवृष्टीमुळे दोन राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक ठप्प झाली. अटल बोगद्याच्या रोहतांगभोवती तीन फूट बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग मनालीवरून वाहतूक ठप्प झाली आहे. अटल बोगद्यापर्यंत रोहतांग मार्ग बंद आहे.
(ANI)"हिमाचल प्रदेशातील औट-लुहरी राष्ट्रीय महामार्ग ३०५ वर देखील या भागात नवीन हिमवृष्टी झाल्यामुळे वाहतूक बंद आहे.
(ANI)टोरुल एस रवीश, उपायुक्त कुल्लू यांनी नमूद केले की प्रशासनाने राज्याच्या उंच भागात पर्यटकांची ये-जा थांबवली आहे आणि पर्यटकांना एक सूचना जारी केली आहे.
(ANI)"पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून, प्रशासनाने पर्यटकांची ये-जा थांबवली आहे. तसेच पर्यटकांसाठी सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. ज्यात त्यांनी उंचावरील पर्यटन क्षेत्रांना भेट देऊ नये असे म्हटले आहे. कुल्लूमधील उंच भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे.
(ANI)अटल टनेल रोहतांगच्या आजूबाजूला ३ फूट बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद आहे आणि जलोडी खिंडीवर ताज्या बर्फवृष्टीमुळे, राष्ट्रीय महामार्ग ३०५ वर देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
(ANI)दरम्यान, IMD ने १८ आणि २० फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश आणि १९ आणि २० फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
(ANI)दरम्यान, खोऱ्याच्या उंच भागात नुकत्याच झालेल्या हिमवर्षावानंतर बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट परदेशी स्कीअर आणि साहसप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
(PTI)