छुपे कॅमेऱ्यांपासून नेहमी सावध रहा. हॉटेलच्या रुममध्ये किंवा बाथरूममध्ये छुप्या कॅमेऱ्यांबद्दल वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या येतात. बाहेर जाताना काळजी घ्या. चला जाणून घेऊया अशा काही पद्धती ज्या छुपे कॅमेरे शोधण्यात मदत करू शकतात.
(Freepik)हॉटेलच्या खोलीत जा आणि आधी छताचा पंखा तपासा. लाइट बंद करा आणि फोनचा कॅमेरा चालू करा. लाइट चमकत आहेत की नाही हे पाहण्यासाठी छतावरील पंख्याकडे पहा. लुकलुकणारा लाल लाइट दिसल्यास काळजी घ्या.
(Freepik)रुममध्ये अनावश्यक वस्तू दिसल्या तर लगेच काढून टाका. खोलीत आवश्यक नसलेली कोणतीही वस्तू किंवा फर्निचर असल्यास त्यापासून सावध रहा. यात छुपा कॅमेरा असू शकतो.
(Freepik)कॅमेरे अनेकदा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये लपलेले असतात. हॉटेलच्या खोलीतील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सकडे चांगले लक्ष द्या.
(Freepik)कोणत्याही स्पीकर किंवा लिसनिंग डिवाईस चांगले पहा. तो कॅमेरा सहजपणे लपवू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचे नीट निरीक्षण करा.
(Freepik)