Vastu Tips: रात्री झोप येत नाही? या गोष्टींचे पालन केल्यास मिळेल शांती व आराम
- Tips for Sound Sleep: तुम्हाला सुद्धा रात्री शांत झोप लागत नसेल तर या काही गोष्टींचे पालन करा. वास्तुशास्त्रात झोपण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले आहे.
- Tips for Sound Sleep: तुम्हाला सुद्धा रात्री शांत झोप लागत नसेल तर या काही गोष्टींचे पालन करा. वास्तुशास्त्रात झोपण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले आहे.
(1 / 6)
वास्तुशास्त्रानुसार अनेक समस्यांवर घरगुती उपाय आहेत. दिवसभराच्या तणावातून मुक्त होण्यासाठी रात्री गाढ झोप आवश्यक आहे. पण झोप नेहमीच आरामदायक नसते. दिवसभरातील विचार आणि त्रास दूर करून शांत झोप मिळवण्यासाठी काही सोप्या वास्तु टिप्स पहा.
(2 / 6)
डोके दक्षिण दिशेला ठेवावे- झोपताना डोके दक्षिण दिशेला ठेवण्याची काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार नेहमी उत्तरेकडे पाय ठेवून झोपावे आणि दक्षिणेकडे डोके ठेवावे असे सांगितले आहे. दक्षिण हे यमदूताचे स्थान मानले जाते. म्हणूनच झोपताना डोके नेहमी दक्षिणाभिमुख ठेवावे असे म्हणतात. दक्षिणेकडे पाय ठेवल्यास अस्थिरता आणि अशांतता वाढते. (Freepik)
(3 / 6)
पूर्वेकडे डोके - झोपताना डोके पूर्वेकडे ठेवा आणि पश्चिमेला पाय असतील. अशा प्रकारे तुम्हाला शांत झोप मिळेल. (Freepik)
(4 / 6)
बेडरूममध्ये हे ठेवू नका - बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवू नका असे म्हणतात. यामुळे कुटुंबात अशांतता वाढण्याचा धोका आहे. ज्याचा परिणाम दाम्पत्य जीवनावरही होतो. त्यामुळे झोपेचाही त्रास होतो.
(5 / 6)
आरसा - बेडरूममध्ये आरसा नसावा याची काळजी घ्यावी. तुमच्या पलंगासमोर आरसा चुकूनही ठेवू नका. तसेच वास्तुशास्त्रानुसार दरवाजाकडे तोंड करून झोपणे योग्य नाही.
(6 / 6)
अंथरुणावर खाणे - अनेकांना असे वाटते की, रात्री झोपताना खाणे-पिणे न करणे चांगले असते. अनेकांना पलंगावर बसून खायची सवय असते. असे करू नये. अंथरुणावर जेवण करण्याच्या सवयीपासून दूर राहण्याबाबत अभ्यासक सांगतात. (ही माहिती सामान्य आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी यांनी याची पडताळणी केलेली नाही.)(Freepik)
इतर गॅलरीज