उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्यासाठी लिंबाचा रस योग्य असतो. पण जेव्हा हा लिंबाचा रस ५ ते ६ ग्लास बनवणार असतो तेव्हा अनेकदा असं वाटतं की लिंबाचा रस अजून थोडा असता तर चांगलं झालं असतं! लिंबापासून अधिक रस घ्यायचा असेल तर तुम्ही काही सोप्या मार्गांनी ते करू शकता. त्या मार्गांवर एक नजर टाका.
(Freepik)घरात लिंबू नेहमी वापरले असतात. केवळ स्वयंपाकच नव्हे तर लिंबाचा वापर सौंदर्यासाठीही केला जातो. भांडी धुताना ही लिंबू फायदेशीर ठरते. त्यामुळे एकदा बाजारातून लिंबू आले की ते वाया जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अशावेळी लिंबू वाचवण्याचा सोपा मार्ग पाहूया.
(Freepik)लिंबू साठवण्यासाठी काय करावे - लिंबू कापून हवाबंद झिपलॉक पाऊच किंवा बॉक्समध्ये ठेवल्यास बराच काळ चांगला राहतो, असं म्हटलं जातं. काचेच्या ग्लासमध्ये लिंबू टाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता. लिंबू थोडा वेळ चांगला राहील. लिंबू वाळत असल्याचे दिसल्यास तुम्ही त्याचा रस काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
(Pixabay)लिंबाचा रस अधिक मिळवण्यासाठी पॉवर ट्रिक्स - जेव्हा तुम्ही लिंबू कापता तेव्हा ते थोड्या वेळापूर्वी हलक्या गरम पाण्यात भिजत ठेवा. अर्धा तास भिजल्यानंतर लिंबू कापून घ्या. लिंबातून अधिक रस निघेल.
(Freepik)