कारला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना ते खायला अजिबात आवडत नाही. कारण ही भाजी चवीला खूप कडू असते. पण तुम्ही या भाजीचा कडूपणा कमी करू शकता. चला जाणून घ्या उपाय.
(Freepik)कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी ही भाजी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजवावी. हे फ्लेव्होनॉइड्सचे शोषण करण्यास मदत करते. ज्यामुळे कारल्याची कडू चव कमी होते.
(Freepik)कारल्याचे छोटे तुकडे करून दह्यामध्ये २ तास भिजत ठेवा. असे केल्याने त्याचा कडूपणा जाणवणार नाही. दह्यातील आंबट कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी खूप गुणकारी आहे.
(Freepik)कारल्याची भाजी शिजवताना आमचूर पावडर किंवा लिंबू देखील वापरू शकता. त्यामुळे भाजीची कडू चव सहज निघून जाते.
(Freepik)