Vidarbha Flood Updates : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 6)
Vidarbha Flood Updates : गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. (HT_PRINT)
(2 / 6)
Vidarbha Flood Updates : सतत होत असलेल्या पावसामुळं विदर्भातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.(NDRF)
(3 / 6)
विदर्भातील पुराचा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. (PTI)
(4 / 6)
बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात पुरामुळं लोकांच्या घरात पाणी साचलं आहे. त्यामुळं नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.(HT_PRINT)
(5 / 6)
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. पावसामुळं पीकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे.(AFP)
(6 / 6)
पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.(PTI)