मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  Five Iconic Temples In India

five iconic temples in india : पर्यटकांच्या पसंतीला उतरणारी भारतातली पाच प्रसिद्ध मंदिरं

May 01, 2023 04:57 PM IST Dilip Ramchandra Vaze
May 01, 2023 04:57 PM , IST

Temples To Visit In India : आपला देश सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. आपल्या देशात परदेशातून फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. भारतातली अशी पाच मंदिरं जी पर्यटकांच्या पसंतीला उतरतात, ती आज आपण पाहाणार आहोत.

इमेज क्रेडिट: REUTERS/STRINGER १. सुवर्ण मंदिर, अमृतसर: सुवर्ण मंदिर हे शीख धर्माच्या खोल आध्यात्मिक आणि सामुदायिक तत्त्वांचे प्रतीक आहे. एक अत्यंत सुमदर मंदिर म्हणून याकडे पाहीलं जातं त्याचप्रमाणे सुवर्ण मंदिराशी शीख धर्माचा खूप मोठा संबंध आहे. इथं शीख धर्मातला सर्वात पवित्र ग्रंथ ग्रंथ साहेब ठेवला गेला आहे. इथं सर्वधर्मीय भाविकांना लंगरमध्ये म्हणजेच देशातल्या एका सर्वात मोठ्या महाप्रसादात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. इथं तुम्ही आपली सेवा देऊ शकता किंवा इथल्या पवित्र भोजनाचा आस्वादही घेऊ शकता.

(1 / 5)

प्रतिमा श्रेय: मीनाक्षी मंदिर वेबसाइट २. मीनाक्षी मंदिर, मदुराई: देवी मीनाक्षीला समर्पित, हे मंदिर द्रविडीयन वास्तुकलेचा नमुना आहे, जे उंच गोपुरम (अलंकृत प्रवेशद्वार), कोरीव काम आणि अप्रतीम शिल्पांद्वारे लक्षवेधक ठरतात.  इथं दर्शनाला येणारे भाविक इथे पूडा करू शकतात किंवा रोजच्या आरतीत सहभागी होऊ शकतात. वास्तुकलेचा अनोखा संगम म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे

(2 / 5)

प्रतिमा क्रेडिट: ANI/ANI ३. जगन्नाथ मंदिर, पुरी: भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं गेलं आहे, जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ किंवा भगवान कृष्ण यांची प्रतिमा आहे. पुरीच्या जगन्नाथाची सर्वात मोठी ओळख म्हणजे इथं दरवर्षी होणारी जगन्नाथ यात्रा. ही यात्रा जगातल्या एका मोठ्या यात्रेसाठी ओळखली जाते. पुरीच्या जगन्नाथाचा रथ भविकांच्या हस्ते ओढला जातो. हे चित्र अत्यंत मनमोहक असं असतं.

(3 / 5)

प्रतिमा क्रेडिट: pexels/Aadhithyan Pandian4. बृहदीश्वरर मंदिर, तंजावर: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असणारं मंदिर. अभियांत्रिकी चमत्कार आणि वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. चोल राजवंशाने ११व्या शतकात बांधलेले,हे  मंदिरात तब्बल २१६ फूट उंच आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे गर्भगृहात मोठा नंदीही आहे.

(4 / 5)

प्रतिमा क्रेडिट: ५. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी: भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक मंदिर म्हणून काशी विश्वनाथ मंदिर ओळखलं जातं , वाराणसीचं हे काशी विश्वनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. इथली आरतीही जगप्रसिद्ध आहे. या आरतीला दुरवरून भाविक हजेरी लावत असतात. 

(5 / 5)

WhatsApp channel

इतर गॅलरीज