मराठी बातम्या  /  Photos  /  Five Big Things About T20 World Cup 2022 Team India Squad Selection Including Jasprit Bumrah Comeback

T20 WC India Squad: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, संघ निवडीबद्दल ५ मोठ्या गोष्टी, जाणून घ्या

T20 WC
T20 WC
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Sep 12, 2022 07:08 PM IST

India Squad For T20 World Cup sanju samson: ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केले आहे, परंतु सध्या स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, संजू सॅमसनलादेखील वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आलेली नाही.

ICC T20 विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात धक्कादायक बदल झाले नसले तरी १५ सदस्यीय मुख्य संघ आणि चार स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत काही मनोरंजक गोष्टी आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

टीम इंडियासाठी चांगली बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल संघात परतले आहेत. दुखापतीमुळे दोघेही आशिया कप २०२२ मध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. दोघांनीही तंदुरुस्त असून ते संघात पुनरागमन करण्यास तयार आहेत. दुसरीकडे, संजू सॅमसन ना मुख्य संघात आहे ना स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत. 

वर्ल्डकपसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

वर्ल्डकप संघाच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी 

बुमराह आणि हर्षलचे पुनरागमन

आशिया चषकादरम्यान टीम इंडियाकडे दर्जेदार वेगवान आक्रमणाची कमतरता होती. मात्र आता बुमराह आणि हर्षलच्या पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता कमी झाली असावी. बुमराह आणि हर्षल T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत खेळणार आहेत. या सामन्यांमध्ये त्यांचा चांगला सराव होईल. जेणेकरून दोघेही मेगा स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार होतील.

ऋषभ पंत संघाबाहेर होण्यापासून बचावला

ऋषभ पंतचा अलिकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधला रेकॉर्ड चांगला नाही. त्यामुळे त्याच्यावर डच्चू मिळण्याची टांगती तलवार होती. पण असे झाले नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान पंतला पुन्हा फॉर्म मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. निवड समितीच्या बैठकीत पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाला घेण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे, कारण केएल राहुल हा देखील विकेटकीपिंग करू शकतो. अशा स्थितीत दोन यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश करणे थोडे कठीण वाटत होते.

शमी टी-२० क्रिकेटमध्ये पुनरामगन पण मुख्य संघात नाही

मोहम्मद शमीच्या नावाचीही बरीच चर्चा झाली होती. तो मुख्य संघाचा भाग असेल असे वाटत होते. परंतु सध्या तो स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. शमीचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात उपयोगी पडू शकतो. तो संघाचा भाग नसला तरी त्याच्या उपस्थितीमुळे युवा वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होऊ शकते.

बिश्नोईऐवजी अश्विनवर विश्वास 

रविचंद्रन अश्विनला मुख्य संघात स्थान मिळाले आहे. तर रवी बिश्नोई स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. बिष्णोईला संधी मिळाल्यावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण निवड समितीने अश्विनच्या अनुभवाचा विचार करुन त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

निवडकर्त्यांचा अर्शदीपवर विश्वास 

अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. अर्शदीपला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. तो T20 विश्वचषकाच्या संघाचा मुख्य भाग बनला आहे. 

संजू सॅसमन संघात नाही

संजू सॅमसनसारखा खेळाडू ना मुख्य संघात आहे ना स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत. संजू पुल आणि हुकचे फटके खेळण्यात माहीर आहे.ऑस्ट्रेलियातील उसळणाऱया खेळपट्यांवर संजू नक्कीचा फायदेशीर ठरला असता. मात्र, संजूला संधी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, शॉर्ट बॉलवर श्रेयस अय्यर हा नेहमीच संघर्ष करताना दिसतो. असे असूनही अय्यर स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत आहे.