200 MP Camera Phones India: २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.
(1 / 5)
रेडमी नोट १३ प्रो 5G: या रेडमी फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.
(2 / 5)
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5G: सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात १२ मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ७६ हजार ५६६ रुपये आहे. ही हिरव्या रंगाच्या फोनची किंमत आहे.
(3 / 5)
इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 5G: मागील बाजूस मुख्य कॅमेरा २०० मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फ्लिपकार्टवर ८ जीबी + २५६ जीबी फोनची किंमत ३४ हजार ९९० रुपये आहे.
(4 / 5)
रेडमी नोट १३ प्रो+ 5G: या रेडमी फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ८ जीबी रॅम +२५६ जीबी व्हर्जनची किंमत फ्लिपकार्टवर २२ हजार ४९६ रुपये आहे. फ्यूजन पर्पल कलरच्या फोनची ही किंमत आहे.
(5 / 5)
रियलमी ११ प्रो+ 5G: या फोनमध्ये ओआयएससह २०० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ८ जीबी + २५६ जीबी व्हर्जनची किंमत फ्लिपकार्टवर २८ हजार ९९० रुपये आहे.
(6 / 5)
स्मार्टफोन खरेदी करताना केवळ कॅमेराच नाही तर प्रोसेसर, बॅटरी पॅक आदी इतर फिचर्सही लक्षात घ्यायला हवेत. अशा स्मार्टफोन्सवरील वाचकांचे रिव्ह्यू, टेक एक्सपर्टचे रिव्ह्यू वाचून फोन खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा.