
तुम्ही तुमच्या सामान्य कपड्यांसोबत तुमचे जिमचे कपडे देखील मशीनमध्ये धुता का? असे केल्याने घामाच्या वासासह कपड्यांवर अडकलेले बॅक्टेरिया आणि जंतू साफ होतात असे तुम्हाला वाटते का? चला या प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेऊया आणि हे देखील जाणून घेऊया की, जिम वेअर कपडे धुण्याची आणि सुकवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
(shutterstock)ट्रेडमिलवर धावताना किंवा जिममध्ये तासनतास वर्कआउट करताना घातलेल्या कपड्यांना घामाचा वास येऊ लागतो. जर तुम्ही जिममधून परत आल्यावर कपडे न धुता कपाटात ठेवून, नंतर ते पुन्हा परिधान करत असाल, त्यात वाढणारे बॅक्टेरिया तुम्हाला आजारी पाडू शकतात. हे टाळण्यासाठी, कपडे धुताना लिक्विड डिटर्जंट वापरण्याचा सल्ला दिला जातो.
(shutterstock)जिम कपड्यांचे फॅब्रिक खूप संवेदनशील असतात. त्यामुळे हे कपडे हाताने धुणे चांगले मानले जाते. परंतु, काही कारणास्तव तुम्ही हे कपडे मशीनमध्ये धुवत असल्यास, त्यांना जाळीच्या पिशवीत ठेवा आणि लाईट मोडवर धुवा.
(shutterstock)जिमवेअरचे कपडे गरम पाण्यात धुणे टाळा. गरम पाण्यामुळे या कपड्यांचे नाजूक तंतू खराब होऊन त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. तुमचे ॲक्टिव्हवेअर अधिक काळ नवीन आणि स्वच्छ दिसण्यासाठी, ते नेहमी थंड पाण्यात धुवा किंवा मशिनने लाईट मोडवर धुवा.
(shutterstock)जिम वेअरसाठी नाजूक फॅब्रिकचा वापर केला जातो. यामुळे हे कपडे धुण्यासाठी लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट वापरणे नेहमीच चांगले मानले जाते. पावडर डिटर्जंट तुमच्या जिमच्या पोशाखांची गुणवत्ता खराब करू शकते.
(shutterstock)अनेक वेळा जिमचे कपडे धुतल्यानंतरही त्यांना घामाचा वास येतो. अशावेळी कपडे डिटर्जंटमध्ये टाकण्यापूर्वी ते काही काळ मोकळ्या हवेत वाळवणे महत्वाचे आहे. यानंतर, थंड पाण्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घालून त्यात कपडे भिजवून ठेवा. यानंतर सामान्य थंड पाण्याने कपडे धुवा. मशीनच्या गरम हवेमुळे कपड्यांचे फॅब्रिक खराब होऊ शकते, याची विशेष काळजी घ्या. अशा परिस्थितीत हे कपडे हवेशीर ठिकाणी वाळवणे फायदेशीर ठरते.
(shutterstock)जर, तुम्ही जिमचे कपडे दररोज घालून सुद्धा ते रोज धुणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर कपाटात ठेवण्यापूर्वी त्यांना काही काळ मोकळ्या हवेत वाळवू द्या. हे कपडे हवेत कोरडे केल्याने घामाचा वास आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका टाळता येतो. तुमच्याकडे वेळ असेल, तेव्हा तुम्ही ते कपडेनंतर धुवू शकता.
(shutterstock)




