
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात नवा विक्रम घडला. दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी ५० हून अधिक धावा करून विश्वविक्रम रचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले.
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूत ९ षटकार आणि १४ चौकारांसह १६३ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर मिचेल मार्शने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात १०८ चेंडूत १२१ धावा केल्या. ज्यात १० चौकार आणि ९ षटकरांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनीही अर्धशतके झळकावली.
पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीकने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ चेंडूत ६४ धावा केल्या.



