ग्रहण ही खगोलीय घटना आहे परंतु धर्म आणि ज्योतिषशास्त्रात तिचे विशेष महत्त्व आहे. सूर्य हा आत्माकारक आहे आणि जेव्हा सूर्य ग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम सर्वांवर होतो.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री ९ वाजून १२ मिनिटे ते दुपारी १ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील.
या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास २५ मिनिटे असेल. सोमवार ८ एप्रिल रोजी होणारे हे ग्रहण मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात होईल. हे ग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण असेल म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण आहे. विशेष म्हणजे वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
सोमवार ८ एप्रिलचे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, उत्तर दक्षिण अमेरिका, इंग्लंडचे वायव्य प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यापासून नुकसानकारक किरण बाहेर पडतात, त्यामुळे यावेळी अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतेही चुकीचे काम करू नका.
सूर्यग्रहण काळात घरातून बाहेर पडू नये. असे मानले जाते की या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. नुकसानकारक किरण आणि नकारात्मक ऊर्जा व्यक्तींवर अशुभ प्रभाव टाकतात.
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात गर्भवती महिलांनी चाकू, सुया, कात्री या धारदार वस्तूंचा वापर टाळावा.
सूर्यग्रहणांचा पृथ्वीवरील सर्व सजीवांवर परिणाम होतो. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ते डोळ्यांसाठी हानिकारक आहे.
सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये. ग्रहण काळात शिजवलेले अन्न अशुद्ध मानले जाते. जर अन्न आधीच तयार केले असेल तर त्यामध्ये तुळशीची पाने टाकावी. यामुळे, आहार घेण्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.