
श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय मानला जातो. ऑगस्ट महिन्यातच श्रावण महिना प्रारंभ होत आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रदोष व्रत आहे. हे व्रतही भगवान शंकराला समर्पीत आहे.
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते, जे भगवान शिवाला समर्पित आहे. अशा स्थितीत ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच दिवशी असलेले प्रदोष व्रत अधिक महत्त्वाचे ठरते. या व्रताचे पालन केल्याने शुभ फळ मिळते.
प्रदोष व्रत करताना भगवान शिवाचा अभिषेक करावा, असे मानले जाते. याद्वारे सर्व मनोकामना पूर्ण होतात. व्रतामध्ये अनेक शुभ योगायोग घडणार आहेत. या शुभ योग-संयोगात शिवाची उपासना केल्यास दुहेरी फळ मिळते.
कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३:२८ वाजता सुरू होईल. ते २ ऑगस्ट रोजी दुपारी ३:२६ वाजता संपेल. या स्थितीत या महिन्यातील पहिले प्रदोष व्रत गुरुवार, १ ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. हे व्रत गुरुवारी येत आहे म्हणून त्याला गुरु प्रदोष व्रत म्हटले जाईल.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:१२ ते रात्री ९:१८ पर्यंत असेल. मृगशिर्ष नक्षत्र २ ऑगस्ट रोजी सकाळी १०:२४ पर्यंत राहील, जे पूजेसाठी अतिशय शुभ मानले जाते.



