जम्मू-काश्मीर राज्यात तब्बल दहा वर्षानंतर विधानसभेची निवडणूक होत आहे. यापूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते. तेव्हापासून येथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. दक्षिण काश्मीरच्या कोकेर्नाग या मतदारसंघात मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
(REUTERS)जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी महिला मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याचे चित्र शोपियान जिल्ह्यात दिसूत येत आहे. आजच्या टप्प्यात रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युसूफ तारिगामी, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य गुलाम अहमद मीर, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचा समावेश आहे.
(PTI)जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांसोबतच केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान प्रत्येक मतदार संघात तैनात करण्यात आले आहे. पुलवामा येथील काकापोर मतदान केंद्राबाहेरचे हे दृष्य.
(PTI)काश्मीर खोऱ्यात डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या गावातील नागरिकांना मतदान करणे सोयीचे जावे यासाठी खोऱ्यात शाळांच्या इमारतींमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सध्या काश्मीर खोऱ्यातले हवामान मध्यम स्वरुपाचे असल्याने अधिक संख्येने मतदार घराबाहेर पडतील, असा निवडणूक आयोगाचा अंदाज आहे.
(AP)जम्मू काश्मीरच्या किश्तवर जिल्ह्यात एका शाळेत महिलांसाठी विशेष 'गुलाबी मतदान केंद्र (Pink Booth) उभारण्यात आलं होतं. या पिंक बूथवर फक्त महिला कर्मचारी कर्तव्यावर असून महिला मतदारांसाठी खास हे बूथ उभारण्यात आलं होतं.
(PTI)दक्षिण काश्मीरच्या बिजेहारा येथे आयेशा नावाच्या ९० वर्षाच्या वृद्ध महिलेने मतदान केलं. जम्मू काश्मीरमध्ये आजच्या पहिल्या टप्प्यात २३ लाख २७,५८० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यापैकी ११ लाख ७६, ४६२ पुरूष मतदार आणि ११ लाख ५१,०५८ महिला मतदार आहेत. आज मतदान होत असलेले २४ मतदारसंघ काश्मीर विभागांतर्गत अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाव तसेच जम्मू विभागात डोडा, किश्तवर आणि रामबन जिल्ह्याचा समावेश आहे.
(REUTERS)