Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

Aug 26, 2023 11:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Punalur Madurai Express : ट्रेनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Punalur Madurai Express Fire Incident : पुनालपूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गॅस सिलिंडर फुटल्याने रेल्वेत आग लागली असून त्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
twitterfacebook
share
(1 / 7)
Punalur Madurai Express Fire Incident : पुनालपूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गॅस सिलिंडर फुटल्याने रेल्वेत आग लागली असून त्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.(PTI)
ट्रेनमध्ये आग लागल्याचं समजताच शेकडो प्रवाशांनी आहे त्या स्थितीत रेल्वेबाहेर उड्या टाकल्या. सुदैवाने रेल्वे थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला.
twitterfacebook
share
(2 / 7)
ट्रेनमध्ये आग लागल्याचं समजताच शेकडो प्रवाशांनी आहे त्या स्थितीत रेल्वेबाहेर उड्या टाकल्या. सुदैवाने रेल्वे थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला.(PTI)
स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)
स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.(PTI)
रेल्वेत भीषण आग लागल्यानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने स्वत:ला आणि आप्तजनांना वाचवण्याचे प्रयत्न केले. याशिवाय स्थानिकांनीही घटनास्थळी बचावकार्य सुरू केल्यानं अनेकांचा जीव वाचला आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)
रेल्वेत भीषण आग लागल्यानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने स्वत:ला आणि आप्तजनांना वाचवण्याचे प्रयत्न केले. याशिवाय स्थानिकांनीही घटनास्थळी बचावकार्य सुरू केल्यानं अनेकांचा जीव वाचला आहे.(PTI)
रेल्वेत लागलेल्या आगीत २० प्रवासी होरपळले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
twitterfacebook
share
(5 / 7)
रेल्वेत लागलेल्या आगीत २० प्रवासी होरपळले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली.(PTI)
काही प्रवाशांनी थांबलेल्या रेल्वेतून गॅस सिंलिडरची चोरी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सिलिंडर फुटल्याने रेल्वेत आग लागल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीत रेल्वेचा संपूर्ण डबा भस्मसात झाला आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)
काही प्रवाशांनी थांबलेल्या रेल्वेतून गॅस सिंलिडरची चोरी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सिलिंडर फुटल्याने रेल्वेत आग लागल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीत रेल्वेचा संपूर्ण डबा भस्मसात झाला आहे.(PTI)
काही महिन्यांपूर्वीच ओडिशातील बालासोर येथे भयंकर रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूत रेल्वेत भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून परिसरात कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे.
twitterfacebook
share
(7 / 7)
काही महिन्यांपूर्वीच ओडिशातील बालासोर येथे भयंकर रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूत रेल्वेत भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून परिसरात कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे.(PTI)
इतर गॅलरीज