कोणताही चित्रपट बनवला जातो, तेव्हा रिलीजच्या तारखेचा आधीच विचार केला जातो. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि दिवसाचा त्याच्या कमाईवर मोठा प्रभाव पडतो. आता प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्या हिंदी चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, जे २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित झाले आणि त्यांनी चांगली कमाईही केली.
जय हो : २४ जानेवारी २०१४ रोजी सलमान खानचा 'जय हो' चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला होता. या चित्रपटाला २६ जानेवारीच्या सुट्टीचा फायदाही मिळाला आणि चित्रपटाने प्रचंड नफा कमावला. ६५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास १९५ कोटींची कमाई केली होती.
पद्मावत : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, शाहिद कपूरचा 'पद्मावत' हा चित्रपट २५ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला. हा एक ऐतिहासिक चित्रपट होता, ज्यात रणवीर नकारात्मक भूमिकेत दिसला होता. २१५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि जगभरात सुमारे ५२२ कोटींची कमाई केली होती.
मणिकर्णिका : कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' हा चित्रपट २६ जानेवारीच्या निमित्ताने म्हणजेच २५ जानेवारी २०१९ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती, ज्यात ती लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपये होते, तर त्याने १३२.९५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
पठान : शाहरुख खानचा 'पठान' २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की, त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाची कथा अतिशय चपखल होती आणि लोकांना ती खूप आवडली. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत या चित्रपटाचे बजेट सुमारे २४० कोटी रुपये होते, ज्याने तब्बल ४२२ कोटी रुपयांची कमाई केली होती.