नुकताच 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३' हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात कलाकारांनी आपल्या फॅशनचा जलवा देखील दाखवला.
'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३'मध्ये अभिनेत्री सोनम कपूर निळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर फ्रॉक स्टाईल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावलेला मनोज वाजपेयी काळ्या रंगाची पँट आणि पांढरा ब्लेझर-शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होता.
बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर हिरव्या रंगाच्या ऑफ-शोल्डर फ्लोअर स्वीपिंग गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत होती.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान श्रुती हसनने आपल्या सुंदर लूकने सर्वांच्या नजरा नजरा खिळवल्या होत्या.
बॉलिवूडचा 'जग्गू दादा' अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ नेहमीप्रमाणे हातात एक छोटंसं रोपटं घेऊन अवॉर्ड शोमध्ये पोहोचला होता.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा हिने देखील आपल्या मनमोहक लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते.