३७ वर्षीय लुका मॉड्रिचचा हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. २०१८ मध्ये मॉड्रिचचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. पण त्यावेळी त्यांचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. यावेळीही कर्णधार लुका मॉड्रिकच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली पण सेमी फायनलमध्ये त्यांना अर्जेंटिनाला हरवता आले नाही. या पराभवानंतर मॉड्रिच खूपच निराश दिसला.
(Reuters)सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाने क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचला मिठी मारली आणि चुंबन घेतले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. हे दोन्ही खेळाडू रिअल माद्रिदसाठी एकत्र खेळले आहेत.
क्रोएशियाकडून लुका मॉड्रिचला संपूर्ण सामन्यात भागही घेता आला नाही. तीन गोल केल्यानंतर, संघाचा पराभव पूर्णपणे निश्चित झाला होता.
त्यानंतर मॅनेजरने ८१ व्या मिनिटाला मॉड्रिचला बदली खेळाडू दिला. त्याच्या जागी लोवरो मजर मैदानात आला. मॉड्रिच मैदानातून बाहेर पडताना प्रेक्षकांनी त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला.
(Reuters)संपूर्ण स्पर्धेत क्रोएशियाच्या गोलरक्षका डॉमेनिक लिव्हाकोविचने उत्कृष्ट कामगिरी केली. या सेमी फायनलच्या सामन्यात त्याच्या फाऊलमुळे अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली आणि संघाने पहिला गोल केला. सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने क्रोएशियाचा गोलकिपर डॉमेनिक लिव्हाकोविचला मिठी मारली.
अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. सामन्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू आपल्या चाहत्यांच्या स्टँडकडे गेले. सर्वांनी तिथे जाऊन चाहत्यांसोबत विजय साजरा केला.
(Reuters)अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी डान्सही केला. ७ नंबरची जर्सी परिधान करणाऱ्या रॉड्रिगो डी पॉलने आपली जर्सी काढून तुफान डान्स केला.
(Reuters)फिफा वर्ल्डकपची फायनल १८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. बुधावारी दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात फ्रान्सची गाठ मोरोक्कोशी पडेल. या सामन्यातील विजेता फायनलमध्ये अर्जेंटिनाला भिडेल.
(Reuters)

