यावेळी अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला नाही, तर मेस्सीचे मोठे स्वप्न भंगणार आहे. त्याचप्रमाणे अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघासाठीदेखील हा मोठा धक्का असेल. लिओनेल मेस्सीने आपल्या क्लबसाठी तसेच अर्जेंटिनासाठी अनेक मोठी जेतेपदे जिंकली आहेत. मात्र त्याला वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. त्यामुळे ही विश्वचषक ट्रॉफी त्याच्या सुवर्ण कारकिर्दीत भर घालणार आहे.
(Reuters)३५ वर्षीय लिओनेल मेस्सीचा हा पाचवा विश्वचषक आहे. २०१४ साली मेस्सी संघात असताना अर्जेंटिनाने फायनल गाठली होती. मात्र, त्यात त्यांचा जर्मनीने ३-२ असा पराभव केला. अर्जेंटिना उपविजेता ठरला. याशिवाय मेस्सीने खेळलेल्या इतर तीन विश्वचषकातील संघाची कामगिरी काही विशेष नव्हती.
(Reuters)अर्जेंटिनाच्या संघाने आतापर्यंत केवळ दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्याच वेळी, तीन वेळा (१९३०, १९९०, २०१४) ते फायनल गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. १९७८ मध्ये डॅनियल पासारेलाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात यजमान अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा ३-१ असा पराभव केला होता.
(Reuters)त्यानंतर १९८६ साली डिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. त्यावेळी अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पश्चिम जर्मनीचा ३-२ असा पराभव केला. तेव्हापासून अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.
(hindustan times)दरम्यान, अर्जेंटिनाचा सेमी फायनलमधील क्रोएशियाविरुद्धता मार्ग सोपा होणार नाही. कारण क्रोएशियाने ज्या प्रकारे ब्राझीलला पराभूत केले ते खरोखरच आश्चर्यकारक होते. अर्जेंटिनासाठी चांगली गोष्ट म्हणजे मेस्सी स्वतः जबरदस्त खेळ दाखवत आहे. मेस्सीने ५ सामन्यांत ४ गोल केले आहेत. मेस्सीने सौदी अरेबिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्ध गोल केले.
अर्जेंटिनाला या वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता. त्यांना सौदी अरेबियाने १-२ अशी धुळ चारली. मात्र त्यानंतर अर्जेंटिनाने सलग ४ सामने जिंकले आहेत. सर्वप्रथम, त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये मेक्सिको आणि पोलंड या दोन्ही संघांना २-० ने पराभूत करून राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश केला. या फेरीत अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सला ४-३ अशी धुळ चारली.
(Reuters)



