बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी? -
फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. जर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम जीवनावरही दिसून येतो. आपण आपला बहुतेक वेळ आपल्या बेडरूममध्ये घालवतो. बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. फेंगशुई विद्येमध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या बेडरूमला केवळ एक सौंदर्याचा लूकच देत नाहीत, तर नकारात्मक उर्जेचा प्रभाव देखील कमी करू शकता. फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा कशी कमी करता येईल ते जाणून घेऊ या-
बंद पडलेले घड्याळ -
बंद पडलेले घड्याळ कधीही भिंतीवर टांगू नये. विशेषतः सकाळी उठल्यानंतर थांबलेले घड्याळ पाहणे देखील तुमच्या नशिबाच्या दाराला कुलूप लावू शकते. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बंद घड्याळ ठेवणे शुभ मानले जात नाही.
बेडरूम कोणत्या दिशेला असावे?
बेडरूम नेहमी उत्तर किंवा वायव्य दिशेला बनवले पाहिजे. असे केल्याने पती-पत्नीमधील बंध अधिक घट्ट होतो.
कोमेजलेली रोपे -
घरात सुकलेली रोपे ठेवणे शुभ मानले जात नाही. त्याच प्रमाणे, बेडरूममध्ये वाळलेली काटेरी झाडे देखील ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
फोटो -
बहुतेक लोक त्यांच्या बेडरूमला एक सुंदर लूक देण्यासाठी चित्रे लावतात. बेडरूममध्ये युद्धाचे चित्र लावल्याने पती-पत्नीमधील भांडणे वाढू शकतात. त्याच वेळी, उदास चेहऱ्याचा फोटो बेडरूममध्ये लावू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
बेडची दिशा -
बेडरूममध्ये बेड योग्य दिशेने असणे महत्वाचे आहे. झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते.
रंगांचा वापर -
फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये हलके रंग वापरणे शुभ मानले जाते. त्याच वेळी, बेडरूममध्ये लाल किंवा काळा रंग वापरल्याने पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता वाढते.