मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fathers Day 2024 : सचिन-अर्जुन ते युवराज-योगराज… भारताच्या या पिता-पुत्रांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान

Fathers Day 2024 : सचिन-अर्जुन ते युवराज-योगराज… भारताच्या या पिता-पुत्रांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान

Jun 16, 2024 02:21 PM IST
  • twitter
  • twitter
  • fathers day 2024 team india famous father son : आज १६ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. या खास दिवशी वडील आणि मुलाच्या अनेक कहाण्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेटविश्वातील पिता-पुत्रांच्या जोड्यांबद्दल सांगणार आहोत.
क्रिकेटमधील पिता-पुत्रांची जोडी म्हटल्यानंतर सर्वात आधी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर या जोडीचे नाव डोळ्यांसमोर येते. अशा परिस्थितीत अशाच काही पिता-पुत्रांच्या जोड्यांबाबत आपण येथे जाणून घेऊया.
share
(1 / 9)

सचिन तेंडुलकर- अर्जुन तेंडुलकर- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टीम इंडियासाठी खेळताना त्याने आपल्या कर्तृत्वाने देशाला गौरव मिळवून दिला. सचिनला पाहतच त्याचा मुलगा अर्जुननेही क्रिकेटमध्ये प्रवेश केला. अर्जुन देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
share
(2 / 9)

सुनील गावस्कर- रोहन गावस्कर - या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुनील गावस्कर यांचे नाव आहे. गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीत १२५ कसोटी आणि १०८ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी कसोटीत १०१२२ धावा आणि वनडेमध्ये ३०९२ धावा केल्या.
share
(3 / 9)

त्याचवेळी त्यांचा मुलगा रोहन गावस्कर यानेही क्रिकेटमध्ये नशीब आजमावले. रोहनने आपल्या कारकिर्दीत भारताकडून ११ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १५१ धावा केल्या आणि १ विकेट घेतली. मात्र, रोहनला वडिलांसारखे नाव कमावता आले नाही.
share
(4 / 9)

लाला अमरनाथ- मोहिंदर अमरनाथ - लाला अमरनाथ यांचे नाव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. १९३३ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ११८ धावांची खेळी केली होती. लाला यांनी २४ कसोटी सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली होती.
share
(5 / 9)

याशिवाय त्यांनी बॉलिंगमध्ये ४६ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ यानेही आपली प्रतिभा साऱ्या जगाला दाखवली. मोहिंदर अमरनाथ १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हिरो होता. त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोहिंदर यांनी ६९ कसोटी सामन्यात ४३७८ धावा आणि ८५ एकदिवसीय सामन्यात १९२४ धावा केल्या.
share
(6 / 9)

युवराज सिंग-योगराज सिंग- यादीत चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे नाव आहे, युवीचे वडीलही क्रिकेट खेळले आहेत. युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यांनी कसोटीत १ बळी आणि एकदिवसीय सामन्यात ४ बळी घेतले.
share
(7 / 9)

त्याचवेळी युवराजने आपल्या कारकिर्दीत ४० कसोटी खेळताना १९०० धावा, ३०४ एकदिवसीय सामने खेळताना ८७०१ धावा आणि ५८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ११७७ धावा केल्या.
share
(8 / 9)

स्टुअर्ट बिन्नी-रॉजर बिन्नी - यादीत पाचव्या क्रमांकावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचे नाव आहे, जे १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होते. रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. मात्र, तो वडिलांसारखा लोकप्रिय होऊ शकला नाही.
share
(9 / 9)

इतर गॅलरीज