(1 / 5)ओडीसी हॉक एलआय : ओडीसी हॉक प्लस हाय स्पीड स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये १८०० वॅट मोटरसह १९०० वॅट सर्वोच्च शक्तीची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोटर ७२ व्होल्टसह ऑपरेट होते तर ४४ एनएमचा टॉर्क देते. स्कूटर कीलेस व इलेक्ट्रिक सिस्टमसह सुरू होते. फ्रण्ट-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह प्रतितास ७० किमीचा गाडीचा वेग आहे. या स्कूटरचे आकारमान १९०० x ७३० x ११३० मिमी आहे, व्हीलबेस १३८० मिमी आणि सीट उंची ८३० मिमी आहे. हॉकचे एकूण वजन १२८ किग्रॅ आहे. तसेच स्कूटरमध्ये अलॉई व्हील रिम्स आणि १५० किग्रॅची लोडिंग क्षमता आहे. या स्कूटरमध्ये २.८८ केडब्ल्यू लि-आयन बॅटरी आहे, जी ४ तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. स्कूटरमध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत (पुढील बाजूस १००/८० - १२ आणि मागील बाजूस १२०/७० - १२) आणि टेलिस्कोपिक फ्रण्ट सस्पेंशन आहे, तसेच सुलभ राइडसाठी दोन्ही बाजूस स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक रिअर सस्पेंशन आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चारकोल ब्लॅक, ग्रॅव्हिटी ग्रे, इंटेन्स रेड, मिरेज व्हाइट, ट्रान्स मॅट ब्ल्यू अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची किंमत १,१७,९५० रूपये ऐवढी आहे.