मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chandani Chowk accident : बसचे ब्रेक फेल झाल्याने पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

Chandani Chowk accident : बसचे ब्रेक फेल झाल्याने पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

Jun 13, 2024 07:13 PM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Chandani Chowk accident: पुण्यातील चांदणी चौकात बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या घटनेत १ जण ठार झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. या बसने आधी एका मिक्सरला त्यानंतर काही वाहनांना धडक दिली.
पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज दुपारी ५ च्या सुमारास प्रसिद्ध चांदणी चौकात भीषण अपघात झाला आहे. एका बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून यात एक जण ठार झाल्याची माहिती आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. 
share
(1 / 5)

कोथरूडमधील चांदणी चौकात हा प्राणघातक अपघात झाला आहे.  हा अपघात झाल्यावर या चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
share
(2 / 5)

सुरुवातीला या बसने एका मिक्सर कंटेनरला धडक दिली. यानंतर ही बस रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व काही कारला धडकली. या घटनेत १ जण ठार ठार पाच ते ७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. 
share
(3 / 5)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीमेंट कॉक्रीट मिक्सरला धडक दिल्याने रस्त्यावर सीमेंट पसरले होते. 
share
(4 / 5)

अपघातामुळे या चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत ती बाजूला केली. तसेच जखमी नागरिकांना दवाखाण्यात पाठवले.  
share
(5 / 5)

इतर गॅलरीज