(1 / 3)रियलमी जीटी ७ प्रो: रियलमीचा हा पॉवरफुल फोन 5800 एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे, जो १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ३० मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज होतो. या फोनमध्ये ग्राहकांना फुल एचडी+ रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६५०० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. तर, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय.प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट पाहायला मिळेल.