किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी (MSP) यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आपला सुरू असलेला विरोध अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी देशव्यापी 'रेल रोको' आंदोलन केले. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने हे आंदोलन पुकारले होते.
(PTI)अमृतसरच्या बाहेरील देवीदास पुरा येथे, 'रेल रोको' आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी अडवलेला रेल्वे ट्रॅक.
(PTI)शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
(PTI)पंजाबमध्ये, शेतकऱ्यांनी अमृतसर, लुधियाना, तरन तारण, होशियारपूर, फिरोजपूर, फाजिल्का, संगरूर, मानसा, मोगा आणि भटिंडा यासह २२ जिल्ह्यांतील ५२ ठिकाणी रेल्वे रोको आंदोनल करण्यात आले.
(PTI)शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी लोकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
(ANI)