मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Long March: मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, सध्या लाँग मार्च स्थगित मात्र दीर्घ लढाईसाठी शेतकरी तयार!

Long March: मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, सध्या लाँग मार्च स्थगित मात्र दीर्घ लढाईसाठी शेतकरी तयार!

17 March 2023, 19:19 IST Shrikant Ashok Londhe
17 March 2023, 19:19 IST

Farmers Long March : सरकारच्या आश्वासनावर व मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास नाही. त्यामुळे आपल्या मागण्यासंदर्भात सरकारने लेखी आदेश काढावा अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच शेतकरी वाशिंद येथे तंबू ठोकत असून दिल्ली आंदोलनाच्या धर्तीवर शेतकरी दीर्घ लढाईसाठी तयार असल्याचे दिसत आहे.

नाशिकहून मुंबई विधानमंडळावर निघालेला किसान सभेचा लाँग मार्च सद्या मुंबईहून ८० किलोमीटर दूर वाशिंद येथील ईदगाह मैदनावर मुक्कामी आहे.

(1 / 8)

शिंदे सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी व आदिवासींनी आपला अपना तात्पुरता स्थगित केला आहे. मात्र किसान सभेच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोर पावले न उचलल्यास ते मुंबईकडे कूच करतील.

(2 / 8)

शिंदे सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी व आदिवासींनी आपला अपना तात्पुरता स्थगित केला आहे. मात्र किसान सभेच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोर पावले न उचलल्यास ते मुंबईकडे कूच करतील.(Praful Gangurde HT photos)

आमचा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास नाही. त्यामुळं मागण्यासंदर्भात सरकारनं लेखी आदेश काढावा अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

(3 / 8)

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून शेतकरी व आदिवासी २५० किलोमीटर पायी चालत आले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सरकारने गुरुवार किसान सभेच्या नेत्यांश चर्चा केली व त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या तर काही विचाराधीन आहेत.

(4 / 8)

मुंबईपासून ८० किलोमीटर दूर वाशिंदच्या ईदगाह मैदानवर शेतकरी जमले आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांनी येथे तंबू ठोकले आहेत. अजूनही काही तंबू बनवले जात आहेत. त्याचबरोबर लोकगीते गाऊन जनजागृती केली जात आहे. नेते भाषण करत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावत आहेत. 

(5 / 8)

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, २०१८ मध्ये लाँग मार्चच्या दरम्यान सरकारने  विश्वासघात केला होता. त्यामुळे शेतकरी सध्या माघारी फिरण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, कृषी संबंधित मागण्यांवर सरकारकडून काही निर्णय होत नाही किंवा यावर प्रशासनिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही, ते आंदोलन करत राहतील.

(6 / 8)

किसान सभेच्या नेत्यांनी म्हटले की, आम्हाला वाटले की, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. तर आमचे हे लाल वादळ माघारी फिरले. नाहीतर ईदगाह मैदानावर आराम केल्यानंतर शेतकरी नव्या जोमाने मुंबईकडे कूच करेल व मुंबई बंद करेल. 

(7 / 8)

माकपा नेते व माजी आमदार जेपी गावित या मार्चचे नेतृत्व करत आहेत. गावित यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत सरकार अधिकाऱ्यांना आदेश देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.

(8 / 8)

इतर गॅलरीज