मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Heeramandi Looks: १४ वर्षांनंतर फरदीन खानची मोठ्या पडद्यावर वापसी! ‘हीरामंडी’तील ‘या’ चेहऱ्यांना ओळखलंत का?

Heeramandi Looks: १४ वर्षांनंतर फरदीन खानची मोठ्या पडद्यावर वापसी! ‘हीरामंडी’तील ‘या’ चेहऱ्यांना ओळखलंत का?

Apr 07, 2024 11:04 AM IST Harshada Bhirvandekar

Heeramandi Looks: बॉलिवूड अभिनेता फरदीन खान १४ वर्षांनंतर 'हीरामंडी'मधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या नवीन पोस्टरमध्ये अभिनेता शाही अवतारात दिसला आहे. 

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. या वेब सीरिजमध्ये सगळ्या महिला कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांचा समावेश आहे. शनिवारी निर्मात्यांनी या सीरिजमधील आणखी काही महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या पुरुष कलाकारांचे पोस्टर रिलीज केले आहेत. यात फरदीन खान, शेखर सुमन, अध्यायन सुमन आणि ताहा शाह हे कलाकार दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

शनिवारी भन्साळी प्रॉडक्शनने नवीन कलाकारांची ओळख करून देण्यासाठी चार नवीन पात्रांचे पोस्टर रिलीज केले आहेत. बॉलिवूड अभिनेता फरदीन खान १४ वर्षांनंतर 'हीरामंडी'मधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या नवीन पोस्टरमध्ये अभिनेता शाही अवतारात दिसला आहे. तो एका आलिशान सोफ्यावर बसला आहे आणि त्याच्यासमोर दागिन्यांनी भरलेला ट्रे ठेवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रेम आणि कर्तव्य यांच्यात भरडलेला, वली मोहम्मद त्याच्या शाही जबाबदाऱ्यांसह त्याच्या मनातील इच्छांशी समेट करण्याचा प्रयत्न करतो’. फरदीन खान वली मोहम्मदच्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अभिनेता शेखर सुमन आणि त्याचा मुलगा अध्ययन सुमन हे देखील या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. शेखर सुमन ‘नवाब’ची भूमिका साकारत असून त्याच्या पात्राचे नाव ‘झुल्फिकार’ आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अध्यायन सुमनने त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो या सीरिज ‘जोरावर’ हे पात्र साकारणार आहे. 'हीरामंडी: द डायमंड बाजार' १९४०च्या दशकावर आधारित आहे. याचा प्रीमियर १ मे रोजी नेटफ्लिक्सवर होईल. ‘हीरामंडी’ हीओटीटी जगतातील सर्वात महागडी सीरिज असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरिजचे बजेट सुमारे २०० कोटी रुपये आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सीरिज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे पोस्टर आणि स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर एक गाणे रिलीज झाले, ज्याने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली होती. आता 'हीरामंडी'१ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सीरिज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे पोस्टर आणि स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर एक गाणे रिलीज झाले, ज्याने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली होती. आता 'हीरामंडी'१ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज