बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे, जिथे सामान्य माणूस कधी स्टार होईल किंवा स्टार कधी सामान्य माणूस होईल, हे तुम्हाला कळणार देखील नाही. इंडस्ट्रीत असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी खूप दुःख आणि वेदना सहन करून इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. ती अशी एक फिल्ममेकर आहे, जिने बऱ्याच संघर्षानंतर आज बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे आणि लक्झरी लाईफ देखील जगते आहे.
(instagram)बॉलिवूडच्या या दिग्दर्शिका-निर्मातीचं नाव फराह खान आहे. फराह बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. पण, ती आज जिथे पोहोचली आहे, तिथपर्यंत पोहोचणे सोपे नाही.
(instagram)फराह ही स्टंटमॅन आणि फिल्ममेकर कामरान खान यांची मुलगी असली तरी, फराहला तिच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला होता.
(instagram)पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत फराहने तिच्या प्रवासाबद्दल सांगितले होते, ‘माझे वडील निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते, पण ते बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करायचे. तो कधीही ए-लिस्टर नव्हते. यानंतर त्यांनी ए ग्रेड चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यात सर्व पैसे गुंतवले. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि रविवारी आम्ही गरीब झालो होतो.’
(instagram)फराह म्हणाली होती की, आम्ही एका रात्रीत श्रीमंत ते गरीब झालो आणि आमचा संघर्ष १५ वर्षे सुरू राहिला. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी आईचे दागिने, घरातील फर्निचर अशा घरातील अनेक वस्तू विकाव्या लागल्या.
(instagram)फराहने सांगितले होते की, जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा तिच्या खिशात अवघे ३० रुपये होते. वडिलांवर अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून तिने आणि तिच्या भावाने घरोघरी जाऊन काही नातेवाईकांकडून पैसे मागितले.
(instagram)त्यानंतर फराहने 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून कोरिओग्राफर म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. फराहने रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने शाहरुख खानच्या 'कभी हा कभी ना' या चित्रपटात कसे काम मिळवले होते. त्या चित्रपटादरम्यान सर्व क्रू मेंबर्समध्ये फराहला सर्वाधिक पैसे मिळाले होते.
(instagram)फराहने सांगितले की, मला एका गाण्यासाठी ५ हजार रुपये मिळाले आणि चित्रपटात ६ गाणी होती, त्यामुळे मला एकूण ३० हजार रुपये मिळाले. तर शाहरुखला या चित्रपटासाठी २५ हजार रुपये मिळाले आहेत.
(instagram)या चित्रपटादरम्यानच फराह आणि शाहरुखची मैत्री झाली आणि त्यानंतर फराहने 'मैं हूं ना' हा चित्रपट बनवला, ज्यामध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत होता. दोघांनी 'ओम शांती ओम' आणि 'हॅप्पी न्यू इयर'मध्येही एकत्र काम केले आहे.
(instagram)