या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेल्या अनेक तोफांच्या साह्याने तोफगोळे डागत शत्रूंचे ठिकाणे कसे नष्ट केले जातात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी पहिल्यांदाच या युद्ध अभ्यासात पिनाका रॉकेट लॉंचरचा समावेश या युद्ध अभ्यासात करण्यात आला होता.
देवलाळीच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रातील तोपची या वार्षिक सरावाची सांगता मंगळवारी झाली. तोफखाना दलाची शस्त्र सज्जता दर्शवण्यासाठी या सरावाच दरवर्षी आयोजन केलं जातं.
युद्धभुमिवर भारतीय लष्करातर्फे वापरल्या जाणाऱ्या तोफा बोफोर्स, धनुष, कोरियन बनावटीची के ९ वज्र तसेच इंडियन फील्ड गन या तोफांनी लक्ष्यावर भेदक मारा करून शत्रूला कसं नामोहरम केलं जातं याचं दर्शन घडवलं.
भारतीय तोपाखाना दलातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्र यंत्रणा याचं प्रात्यक्षिक यामध्ये दाखवण्यात आलं.
यावेळी तब्बल २० हजार फुटांवरून हेलिकॉप्टर मधून जवानांनी पॅरॅशूटच्या साह्याने उड्या मरून उपस्थितांची मने जिंकली.
या वेळी आयोजित शस्त्र प्रदरशांत अटॅग्स् ही संपूर्ण भारतीय बनावटीची तोफ देखील ठेवण्यात आली होती.
अटॅग्स् ही संपूर्ण भारतीय बनावटीची तोफ असून, भारत फोर्ज या कंपनीनं या तोफेची निर्मिती केली आहे. भारतीय सेनेसाठी बोफोर्स प्रमाणे अतिशय महत्त्वाची तोफ असणार आहे. या तोफेची मारक क्षमता ४८ किलोमिटर आहे. तर बोफोर्स तोफेची मारक क्षमता ३८ किलोमिटर इतकी आहे.
मारा करण्यास सज्ज होण्यासाठी या तोफेल एक मिनिटाचा वेळ लागतो. ही तोफ स्वयंचलित असून, लक्ष्यावर अचूक मारा करते. तोफेच्या चाचण्या सिक्कीम, बलासोर आणि पोखरण या ठिकाणी झाल्या आहेत. अर्मेनिया लष्कराने अटॅगज तोफ दाखल करून घेतली असून भारतीय लष्करात लवकरच दाखल होईल.
भारतीय सैन्य दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सामावेश होत आहे. प्रगत तंत्रज्ञान जवानांना अवगत व्हावं या दृष्टीने प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिलं जातं आहे, असं प्रतिपादन देवळालीचया तोपाखना केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सारणा यांनी पत्रकार परिषदेत केलं.