
मुलांच्या झोप न लागण्याच्या सवयीमुळे अनेकांना त्रास होतो. ते प्रत्येक प्रकारे मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करतात परंतु मुले झोपत नाहीत. अशा वेळी जर तुम्हीही काळजीत असाल तर काही उपाय करून तुम्ही मुलांना झोपायला लावू शकता. मुलांना झोपवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मुलांना कधीही जबरदस्तीने झोपवण्याचा प्रयत्न करू नका. कारण यामुळे मुलांची चिडचिड होऊ शकते.
शेड्युल निश्चित करा - जर तुम्ही मुलांना वेळापत्रकानुसार ठेवलं तर त्यामुळे मुलांना लवकर झोपण्याची सवय होते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलांसाठी टाइट शेड्यूल ठेवा.
मुलांना खेळू द्या - मुलांच्या विकासासाठी खेळणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांना खेळू द्या. मुले बाहेर खेळून थकतात, त्यामुळे त्यांना झोप लागते. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला घेऊन जा.
मुलांना गोष्टी सांगा - मुलांना झोपवण्याचा सर्वात जुना मार्ग म्हणजे त्यांना चांगल्या गोष्टी सांगणे. यामुळे मुलांमध्ये आनंदी आणि आरामदायी हार्मोन्स बाहेर पडतात.
मुलांसोबत खेळा - रात्रीच्या वेळी बेडवर गेल्याबोरबर मुलांना झोप येत नाही. त्यामुळे मुलांसोबत इनडोअर गेम्सही खेळणे खूप गरजेचे आहे. यामुळे मुलांना झोपायला मदत होईल.
मुलांशी बोला - काही वेळा मुलांना त्यांच्या समस्या पालकांसोबत शेअर करता येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही मुलाला रोज विचारले पाहिजे की तुम्हाला काही त्रास आहे का? यामुळे मुलाला मोकळेपणाने बोलता येईल, ज्यामुळे त्याचे मन शांत राहील आणि चांगली झोप लागेल.
मुलांना वेळ द्या - मुलांनाही थोडा वेळ द्या. कधीकधी झोपायला अर्धा तासही लागू शकतो, त्यामुळे मुलांना पुन्हा पुन्हा रागवू नका.
मुलांना सकस आहार द्या - मुले पौष्टिक आहार घेतात तेव्हा त्यांना चांगली झोप लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी मुलांना सकस आहार आणि दूध द्या.






