Joe Root: अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले.
(1 / 5)
अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे शतक आहे.(Action Images via Reuters)
(2 / 5)
रूटला तब्बल ८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावता आले आहे.
(3 / 5)
एजबॅस्टन कसोटी सामन्यात रुटने १५७ चेंडूत ११८ धावांची नाबाद खेळी केली, ज्यात चार षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे.
(4 / 5)
या शतकासह जो रूटने फॅब ४ फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. शतक झळकावण्याच्या बाबतीत रूट पहिल्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
(5 / 5)
स्मिथच्या नावावर ३१ कसोटी शतके आहेत, तर जो रूटच्या नावावर ३० शतके आहेत. या यादीत केन विल्यमसन आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही फलंदाजांच्या नावावर २८-२८ कसोटी शतके आहेत.