Emergency: कंगना रनौतच नव्हे ‘या’ अभिनेत्रींनीही पडद्यावर साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका! तुम्ही पाहिली का?-emergency release before kangana ranaut 7 actresses who played indira gandhi prime minister on big screen ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Emergency: कंगना रनौतच नव्हे ‘या’ अभिनेत्रींनीही पडद्यावर साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका! तुम्ही पाहिली का?

Emergency: कंगना रनौतच नव्हे ‘या’ अभिनेत्रींनीही पडद्यावर साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका! तुम्ही पाहिली का?

Emergency: कंगना रनौतच नव्हे ‘या’ अभिनेत्रींनीही पडद्यावर साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका! तुम्ही पाहिली का?

Sep 01, 2024 12:14 PM IST
  • twitter
  • twitter
Actress Played Indira Gandhi: कंगना रनौत लवकरच इंदिरा गांधींच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा नायिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी कंगनाच्या आधी पडद्यावर इंदिराजींची भूमिका साकारली आहे. 
कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना रनौतला इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी बनून आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांना दाखवणार आहे.
share
(1 / 9)
कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना रनौतला इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी बनून आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांना दाखवणार आहे.(Instagram)
मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही की, एखादी अभिनेत्री पडद्यावर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाच्या आधीही काही बॉलिवूड हिरोइन्सनी कंगना रनौतची भूमिका साकारली आहे. चला जाणून घेऊया...
share
(2 / 9)
मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही की, एखादी अभिनेत्री पडद्यावर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाच्या आधीही काही बॉलिवूड हिरोइन्सनी कंगना रनौतची भूमिका साकारली आहे. चला जाणून घेऊया...(Instagram)
२०२१मध्ये अजय देवगणचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री नवनी परिहारने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या सुरुवातीचा काळ दाखवण्यात आला आहे, जेव्हा भुज तळावर पाकिस्तानने हल्ला केला होता. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, शरद केळकर आणि नोरा फतेही सारखे कलाकार दिसले होते.
share
(3 / 9)
२०२१मध्ये अजय देवगणचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री नवनी परिहारने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या सुरुवातीचा काळ दाखवण्यात आला आहे, जेव्हा भुज तळावर पाकिस्तानने हल्ला केला होता. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, शरद केळकर आणि नोरा फतेही सारखे कलाकार दिसले होते.(Instagram)
अभिनेत्री फ्लोरा जेकब मोठ्या पडद्यावर दोनदा इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे. कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट २०२१साली प्रदर्शित झाला होता. फ्लोरा जेकबने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कंगना रनौत जयललिता यांच्या भूमिकेत दिसली होती. त्याच वेळी, २०१८मध्ये, फ्लोराने अजय देवगणच्या 'रेड' चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिकाही साकारली होती.
share
(4 / 9)
अभिनेत्री फ्लोरा जेकब मोठ्या पडद्यावर दोनदा इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे. कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट २०२१साली प्रदर्शित झाला होता. फ्लोरा जेकबने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कंगना रनौत जयललिता यांच्या भूमिकेत दिसली होती. त्याच वेळी, २०१८मध्ये, फ्लोराने अजय देवगणच्या 'रेड' चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिकाही साकारली होती.(Instagram)
२०१९मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'ठाकरे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर, अभिनेत्री अवंतिका आकेरकरने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
share
(5 / 9)
२०१९मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'ठाकरे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर, अभिनेत्री अवंतिका आकेरकरने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.(Instagram)
२०१७मध्ये मधुर भांडारकरचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया विनोदने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
share
(6 / 9)
२०१७मध्ये मधुर भांडारकरचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया विनोदने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
‘बेल बॉटम’ हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ता इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती. लारा दत्ताला तिच्या व्यक्तिरेखेसाठी खूप प्रशंसा मिळाली. एका जुन्या मुलाखतीत लारा म्हणाली होती की, इंदिरा गांधींची भूमिका साकारणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते.
share
(7 / 9)
‘बेल बॉटम’ हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ता इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती. लारा दत्ताला तिच्या व्यक्तिरेखेसाठी खूप प्रशंसा मिळाली. एका जुन्या मुलाखतीत लारा म्हणाली होती की, इंदिरा गांधींची भूमिका साकारणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते.(Instagram)
२०१२मध्ये दीपा मेहताचा ‘मिडनाइट चिल्ड्रन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सरिता चौधरीने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शबाना आझमी, श्रिया सरन आणि अनुपम खेर सारखे कलाकारही दिसले होते.
share
(8 / 9)
२०१२मध्ये दीपा मेहताचा ‘मिडनाइट चिल्ड्रन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सरिता चौधरीने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शबाना आझमी, श्रिया सरन आणि अनुपम खेर सारखे कलाकारही दिसले होते.(Instagram)
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. किशोरी शहाणे यांनी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
share
(9 / 9)
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. किशोरी शहाणे यांनी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
इतर गॅलरीज