मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hording War : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये होर्डिंगबाजी,पाहा फोटो

Hording War : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये होर्डिंगबाजी,पाहा फोटो

24 June 2022, 15:39 IST Dilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 15:39 IST

एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी गुरुवारी कल्याण, डोंबिवली भागात आम्ही तुमच्यासोबत अशा आशयाचे होर्डिंग लावले होते. त्याला आता उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीही उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे समर्थक असं चित्रं राज्यात पाहायला मिळत आहे. 

गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कल्याण डोंबिवलीत हे अशा पद्धतीचे ‘आम्ही भाई समर्थक’ अशा आशयाचे भले मोठे होर्डिंग लावले होते.

(1 / 6)

गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कल्याण डोंबिवलीत हे अशा पद्धतीचे ‘आम्ही भाई समर्थक’ अशा आशयाचे भले मोठे होर्डिंग लावले होते.(हिंदुस्तान टाइम्स)

रस्त्यावर लागलेल्या या अशा होर्डिंग्जकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नजर जात होती.शिवसेनेत फूट पडल्यावर पहिल्यांदा एकनाथ शिंदे समर्थकांनी जाहीर होर्डिंगबाजी केली होती.

(2 / 6)

रस्त्यावर लागलेल्या या अशा होर्डिंग्जकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नजर जात होती.शिवसेनेत फूट पडल्यावर पहिल्यांदा एकनाथ शिंदे समर्थकांनी जाहीर होर्डिंगबाजी केली होती.(हिंदुस्तान टाइम्स)

त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीही ‘आम्ही सदैव तुमच्यासोबत’ असं सांगत एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांविरोधात ही अशी होर्डिंगबाजी केली.  

(3 / 6)

त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीही ‘आम्ही सदैव तुमच्यासोबत’ असं सांगत एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांविरोधात ही अशी होर्डिंगबाजी केली.  (हिंदुस्तान टाइम्स)

मुंबईतल्या रस्त्यांवर म्हणा किवा अगदी वाशी सर्वत्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ असे होर्डिंग्ज लावलेले पाहायला मिळाले. राज्यात शिवसेनेच्या (उद्वव ठाकरे समर्थक) शाखांमध्ये जाऊन पुढच्या रणनीतीबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर ‘आले ते मावळे, गेले ते कावळे’ अशा घोषणांनी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेलेही पाहायला मिळाले.

(4 / 6)

मुंबईतल्या रस्त्यांवर म्हणा किवा अगदी वाशी सर्वत्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ असे होर्डिंग्ज लावलेले पाहायला मिळाले. राज्यात शिवसेनेच्या (उद्वव ठाकरे समर्थक) शाखांमध्ये जाऊन पुढच्या रणनीतीबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर ‘आले ते मावळे, गेले ते कावळे’ अशा घोषणांनी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेलेही पाहायला मिळाले.(हिंदुस्तान टाइम्स)

We Support Eknath Shinde अशा आशयाचे बॅनर्स, होर्डिंग्ज राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे समर्थक असं वातावरण राज्यात पाहायला मिळालं.

(5 / 6)

We Support Eknath Shinde अशा आशयाचे बॅनर्स, होर्डिंग्ज राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे समर्थक असं वातावरण राज्यात पाहायला मिळालं.(द हिंदू)

उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी असलेली आघाडी तोडावी, यासाठी सोमवारी संध्याकाळी बंडाचं निशाण उभारलं. त्याला शिवसेनेतल्या जवळपास ४० आमदारांचा जाहीर पाठींबा मिळाला. 

(6 / 6)

उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी असलेली आघाडी तोडावी, यासाठी सोमवारी संध्याकाळी बंडाचं निशाण उभारलं. त्याला शिवसेनेतल्या जवळपास ४० आमदारांचा जाहीर पाठींबा मिळाला. (हिंदुस्तान टाइम्स)

इतर गॅलरीज