Ganesh Chaturthi 2023 : राज्यातील अनेक नेत्यांनी घरात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अनेकांनी बाप्पांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे.
(1 / 9)
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील निवासस्थानी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.(HT)
(2 / 9)
मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी वांद्र्यात गणरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित होत्या. दोन्ही नेत्यांनी बाप्पाची पूजा करत आरती केली आहे.(HT)
(3 / 9)
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.(HT)
(4 / 9)
उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.(HT)
(5 / 9)
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबियांनी बारामती येथील निवासस्थानी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी रोहित पवार यांच्या कुटुंबियांनी पूजा करत आरती केली आहे.(HT)
(6 / 9)
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे. त्याच्यासोबत रामगिरी महाराज यांनी देखील गणरायाची पूजा केली.(HT)
(7 / 9)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली आहे.(HT)
(8 / 9)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिविजा फडणवीस उपस्थित होत्या.(HT)
(9 / 9)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा केली आहे. राज्यातील जनतेच्या सुख आणि शांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.(HT)
(10 / 9)
मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबियांसहित गणरायाची पूजा केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी लता शिंदे यांच्यासह त्यांची सून आणि नातूनेही बाप्पाची आरती केली आहे.(HT)