Fire Incident In Srinagar : श्रीनगर शहरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्वयंपाक घरात लागलेल्या आगीनं उग्र रुप धारण केल्यामुळं जवळपास आठ इमारतींचं नुकसान झालं आहे.
(Photo by Waseem Andrabi /Hindustan Times)आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जारी आहेत.
(Photo by Waseem Andrabi /Hindustan Times)शॉपिंग कॉम्प्लेक्समधील भीषण आगीत आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दुर्घटनाग्रस्त इमारतातील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
(Photo by Waseem Andrabi /Hindustan Times)श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठाच्या बाहेर हजरतबल भागात आगीची दुर्घटना घडल्याची माहिती समजताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळाच्या दिशेनं धाव घेतली.
(Photo by Waseem Andrabi /Hindustan Times)