शनी मार्गी चाल सुरू करणार आहे. म्हणजेच तो पुढचे १३४ दिवस वक्री गतीने भ्रमण करणार आहे, रविवार, १३ जुलै २०२५ रोजी तो पुन्हा एकदा पुढचा मार्गी प्रवास सुरू करेल.
त्यामुळे शनी पुन्हा २४० दिवस वक्री राहील. चला तर मग जाणून घेऊया शनी भ्रमणामुळे कोणत्या राशी अडचणीत येतील.
कर्क : शनिदेवाचा तुमच्या राशीवर पडणारा प्रभाव फार चांगला असेल, असे म्हणता येणार नाही, विशेषत: जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर स्वतःची काळजी घ्या. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी षड्यंत्राला बळी पडू शकता.
सिंह : तुमच्यासाठी मार्गी शनिदेवाचा प्रभाव संमिश्र राहील. अविवाहित असाल, तर विवाहाच्या चर्चेला थोडा अधिक वेळ लागेल, परंतु, कामाच्या बाबतीत वेळ चांगला जाईल. संयुक्त व्यवसाय टाळा.