Easy Tips to Remove Holi Colour: होळीला रंग खेळल्यानंतर चेहरा आणि त्वचेवरून रंग निघत नसेल तर तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
(1 / 7)
होळीचा रंग काढण्यासाठी टिप्स - धुलिवंदनला लोक भरपूर रंग खेळतात. जर तुमच्या चेहऱ्यावरील आणि त्वचेवरचा रंग निघाला नसेल आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अंगावरील रंग काढून टाकू शकता.
(2 / 7)
दही आणि कोरफड - दही आणि कोरफड यांचे मिश्रण कापसाच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग स्वच्छ करण्यासाठी वापरा. यामुळे तुमच्या शरीरावरील रंग सहज निघून जाईल.
(3 / 7)
खोबरेल तेल - नारळाच्या तेलाने होळीचा रंग सहज निघून जातो. त्यामुळे तुम्ही ते देखील वापरू शकता.
(4 / 7)
काकडीचा रस - काकडीच्या रसाने होळीचा रंग सहज काढता येतो. काकडीचा रस काढून ते कापसाच्या मदतीने शरीरावर जेथे रंग आहे तेथे लावा आणि स्वच्छ करा.
(5 / 7)
बेसन आणि दही - बेसन आणि दही यांचे मिश्रण शरीरावरील होळीचे रंग सहज काढून टाकते.
(6 / 7)
गरम पाणी आणि मोहरीचे तेल - गरम पाणी आणि मोहरीच्या तेलाच्या मदतीने शरीरातील रंग हळूहळू स्वच्छ करा. ही देखील एक उपयुक्त पद्धत आहे.
(7 / 7)
त्वचेला जास्त चोळू नका - चेहरा आणि शरीरावरील रंग काढण्यासाठी त्वचेला जास्त घासू नका. यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. हलक्या हातांनी शरीरातील रंग स्वच्छ करा.