सौभाग्यवतींचा सण ‘करवा चौथ’ हा यंदा २० ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी महिला मंगलमय जीवनासाठी उपवास करतात. त्या मेकअप करून तयार होतात आणि घरही सजवतात. अशा पवित्र प्रसंगी घरी रांगोळी काढणे प्रत्येक स्त्रीला आवडते. जर, तुम्हाला ‘करवा चौथ’च्या दिवशी काही ट्रेंडिंग रांगोळी डिझाईन्स काढायच्या असतील, तर ‘या’ सोप्या डिझाईन तुमच्यासाठी…
(instagram)जरी तुम्ही रांगोळी काढण्यात फार निष्णात नसलात, तरीही तुम्ही ही साधी रांगोळी डिझाईन करू शकता. लाल, हिरवा आणि निळा अशा रंगांनी सजलेली चाळणीतून डोकावणारी ही स्त्री तुम्ही पटकन काढू शकता. (इमेज क्रेडिट: misssassyart)
ही करवा चौथ थीम असलेली रांगोळीची रचनाही अगदी अनोखी आणि सोपी आहे, जी सहज काढता येते. (इमेज क्रेडिट: Keep.shining.21)
जर, तुम्हाला करवा चौथच्या दिवशी काही खास रांगोळी डिझाईन काढायची असेल, तर ही रांगोळी अगदी परफेक्ट आहे. फक्त ती काढण्यासाठी थोडी अधिक कलात्मकता दाखवावी लागेल. (इमेज क्रेडिट: sukirtiii_mishraaa)
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही पूर्ण स्त्रीची ही पाठमोरी प्रतिकृती बनवू शकता. जिच्या हातात आणि पाण्याचे भांडे दाखवू शकता. (इमेज क्रेडिट: rangolidesignideas)
या करवा चौथला काही अनोखी सजावट करायची असेल, तर अशा प्रकारची रांगोळी घरच्या घरी काढू शकता. सर्वजण तुमच्या रांगोळीचे नक्की कौतुक करतील. (इमेज क्रेडिट: art_and_rangoli_culture)