हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला अनेक उपवास आणि सण आहेत ज्यांना विशेष पौराणिक महत्त्व आहे. दर महिन्याच्या अष्टमी तिथीला दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. वैशाख महिन्यातील १५ मे रोजी मासिक दुर्गाष्टमी साजरी होणार आहे. मासिक दुर्गाष्टमीची पूजा विधीपूर्वक शुभ मुहूर्तावर केल्यास, लोकांना सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. याशिवाय व्यवसाय आणि नोकरीतही यश मिळते.
मासिक दुर्गाष्टमी पूजेची शुभ वेळ:
मासिक दुर्गा अष्टमी तिथी बुधवार, १५ मे रोजी पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल. तर दुर्गाष्टमी तिथी गुरुवार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी समाप्त होईल. उदयातिथीनुसार १५ मे रोजी मासिक दुर्गाष्टमी व्रत करावे.
या प्रकारे करा दुर्गा देवीची पूजा:
ब्रम्ह मुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करा. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठल्यास व्रताचे चांगले फळ प्राप्त होते. स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा.
पूजेच्या ठिकाणी चौरंगावर लाल कापड पसरवून दुर्गा मातेची मूर्ती ठेवावी. दुर्गेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.
देवीला लाल वस्त्र, कुंकू आणि लाल रंगाची फुले अर्पण करा. पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी. दुर्गा चालिसा या मंत्राचा जप आणि पठण करा.
दुर्गा मातेची आरती झाल्यावर फळे, दूध आणि इतर नैवेद्य अर्पण करा आणि पूजेनंतर प्रसाद वाटप करा. या दिवशी दुर्गासप्तशतीचे पठण केल्याने सुख-समृद्धी नांदते आणि आपल्यावर व आपल्या कुटूंबावर देवीची कृपा राहते.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.